पाली ग्रामपंचायतीचे होणार नगरपंचायतीमध्ये रूपांतर अधिसूचना झाली प्रसिद्ध

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.01 (जिमाका) :- जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेल्या पाली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याची अधिसूचना शासनाच्या नगरविकास विभागाने प्रसिध्द केली आहे.  गेल्या कित्येक दिवसांपासून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. 

            पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर होण्यासाठी येथील ग्रामस्थांची मागणी प्रलंबित होती, त्यांनी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याकडे याबाबत लवकर निर्णय व्हावा, यासाठी विनंती केली होती. त्यानुषंगाने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर दि. 31 डिसेंबर 2020 रोजी पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्याबाबतची अधिसूचना शासनाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज