प्रादेशिक परिवहन प्रशिक्षण केंद्राच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी माणगाव तालुक्यातील मौजे जावळी येथील जागा हस्तांतरण कार्यवाही पूर्ण काम लवकर सुरु करण्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे संबंधितांना निर्देश



अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका) :- माणगाव तालुक्यातील जावळी येथे प्रादेशिक परिवहन प्रशिक्षण केंद्रासाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक बांधणीसाठी राज्यमंत्री तथा  पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर महिन्यात मंत्रालयात बैठक संपन्न झाली होती.

            या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने मौजे जावळी, ता. माणगाव येथील गट क्र. 73 क्षेत्री 9.12.00 हे.आर. मधील 2.00.00 हे.आर. जागा उप प्रादेशिक परिवहन कर्यालय, पेण यांनी ब्रेक टेस्ट ट्रॅक व इमारतीसाठी महसूल मुक्त सारामाफीने हस्तांतरण करण्यास मंजूरी दिलेली होती. परंतू या जमिनीमध्ये ब्रेक टेस्ट ट्रॅक बसत नसल्यामुळे माणगाव तालुक्यातील जावळी येथे सुधारित जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जावळी येथील सर्व्हे नं. 73 येथील एकूण 9.12.00 हे.आर. क्षेत्रापैकी 1.30.00 हे.आर. व सर्व्हे नं. 17 येथील  एकूण 0.86.50 हे.आर. क्षेत्रापैकी 0.70.00 हे.आर. क्षेत्र जमीन शासनाकडे पुर्नग्रहीत करण्यात आली असून ही जमीन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण यांना  ब्रेक टेस्ट ट्रॅक करिता हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांचेकडून 250 X 6 मीटर्स आकाराचा ब्रेक टेस्ट ट्रॅक बांधणे, भूखंड विकसित करणे, आवार भिंतीचे बांधकाम, बांधीव गटार बाधंकाम, ब्रेक टेस्ट ट्रॅक व्यतिरिक्त उर्वरीत जागेत पेव्हरब्लॉक पार्किंग बांधकाम, ब्रेक टेस्ट ट्रॅकवर कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांची व्यवस्था, विद्युतीकरण व अनुषंगिक बाबींची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

           

00000

 


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज