पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी श्रीवर्धनमधील मौजे रानवली येथील जागा हस्तांतरित जिल्हा विकासासाठी पालकमंत्री आदिती तटकरेंचा आणखी एक महत्वाचा निर्णय

 



अलिबाग, जि.रायगड दि.18 (जिमाका) :- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, ता.अलिबाग, जि.रायगड यांनी पशुवैद्ययकीय दवाखाना श्रेणी-1, रानवली, ता.श्रीवर्धन या इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी केली होती.  याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

     तद्नंतर या प्रकरणी ग्रुप ग्रामपंचायत रानवली यांनी पशुवैद्ययकीय दवाखाना श्रेणी-1, रानवली, ता.श्रीवर्धन, जि.रायगड या इमारतीसाठी मा.आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे जमीन वर्ग करण्यासंदर्भात विनंती केली होती. या जमिनीबाबत चौकशी करुन उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांनी राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना रानवली, ता.श्रीवर्धन, या इमारतीसाठी मौजे रानवली, ता.श्रीवर्धन, जि.रायगड येथील गट नं.292, क्षेत्र 00-20-00 हे.आर पैकी 0-04-00 हे.आर.ही जमीन ग्रामपंचायत रानवली यांच्याकडून शासनाकडे पुनर्ग्रहण करण्यात आली असून महसूलमुक्त व सारामाफीने मा.आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना राज्यस्तरीय पशुवैदयकीय दवाखाना रानवली, ता.श्रीवर्धन, जि.रायगड या इमारतीच्या बांधकामाकरीता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.

000000

 

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज