जिल्ह्यातील माणगाव,श्रीवर्धनसाठी उपलब्ध होणार फिरते पशूचिकित्सा पथक वाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरेंचे यश

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.01 (जिमाका) :- पशूपालकांच्या दारापर्यंत पशूरुग्णांना पशूवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री पशूस्वास्थ योजना या राज्यस्तरीय योजनेंतर्गत राज्यातील 81 तालुक्यांमध्ये नवीन फिरती पशूचिकित्सा पथके स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

            सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध झालेल्या निधीमधून 71 वाहने उपलब्ध झाली आहेत. या वाहनांचे नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.  पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील माणगाव व श्रीवर्धन तालुक्यांसाठीही फिरते पशूचिकित्सालय पथक वाहन उपलब्ध होणार आहे. यामुळे या तालुक्यांमधील पशूपालकांच्या पशूरुग्णांना पशूवैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज