रोहा उपजिल्हा रुग्णालय येथे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते करोना लसीकरणाला प्रारंभ

 


अलिबाग, जि.रायगड, दि.5 (जिमाका) :- उपजिल्हा रुग्णालय  रोहा येथे आज सकाळी राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते करोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकिता मते यांना करोनाची लस देऊन  या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. 

            यावेळी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, रोहा पंचायत समिती उपसभापती रामचंद्र सकपाळ, मधुकर पाटील, विजयराव मोरे, महेंद्र गुजर, रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, पोलीस उपअधीक्षक किरण सूर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव,  वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंकिता मते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सासणे, पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, अमित उकडे, रोहे अष्टमी नगरपरिषदेचे सर्व विषय समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविका, आरोग्य विभागाचे  इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज