कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत शासनाकडून जिल्ह्याकरिता रु.1 कोटी 94 लाख 50 हजार निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश

 


अलिबाग,जि.रायगड,दि.24(जिमाका) :- कोकणातील ग्रामीण भागातील भूमीपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच कोकणातील विकास कामांची गती वाढविणे, ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाचा विकास होणाऱ्या गावांमध्ये पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावांचा विकास करणे, या उद्देशाने राज्य शासनाने "कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम" ही योजना घोषित केली.

             या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात ग्रामीण पर्यटन विकास व्हावा, यासाठी पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी अत्यंत नियोजनबद्ध असा पाठपुरावा केला.  आणि त्याचेच फलित म्हणून सन 2020-21 या आर्थिक वर्षात कोकण ग्रामीण विकास पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सादर झालेल्या 1)भरडखोल, ता.श्रीवर्धन येथे शिवकालीन विठ्ठल मंदिरासमोर सुशोभिकरण करणे (रुपये 25 लक्ष), 2)कुडगाव, ता.श्रीवर्धन येथे शिवकालीन मंदिरासमोर सुशोभिकरण करणे (रुपये 25 लक्ष), 3)आदगाव, ता.श्रीवर्धन येथील पुरातन मंदिरासमोर सुशोभिकरण करणे (रुपये 15 लक्ष), 4)दूरटोली, ता.रोहा येथील शिवमंदिर समोर चबुतरा बांधकाम व सुशोभिकरण करणे (रुपये 19 लक्ष 50 हजार), 5) मदगड-बोर्ली, ता.श्रीवर्धन येथे संवर्धन व सुशोभिकरण करणे (रुपये 15 लक्ष), 6) आंबरसावत, आंबेवाडी नाका, ता. रोहा स्वयंभू मंदिराचे सुशोभिकरण करणे (रुपये 20 लक्ष), 7) वारळ, ता.म्हसळा स्वयंभू दत्त मंदिर परिसर सुशोभिकरण करणे (रुपये 10 लक्ष), 8) पुगाव, ता.रोहा पुरातन दत्त मंदिरात परिसरात भक्तनिवास बांधणे (रुपये 15 लक्ष), 9) वैजनाथ मंदिर, ता.रोहा परिसर सुशोभिकरण करणे (रुपये 10 लक्ष), 10) मेढा, ता.रोहा येथील पुरातन शंकर मंदिरासमोर सुशोभिकरण करणे (रुपये 15 लक्ष), 11) पन्हेळी, ता. तळा येथील पुरातन जिवंत झऱ्याजवळ पायाभूत सुविधा निर्माण करणे (रुपये 15 लक्ष) आणि 12) ग्रा.वरसे ता. रोहा येथील भुवनेश्वर शिवमंदिर परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करणे (रुपये 10 लक्ष) अशा एकूण रु.1 कोटी 94 लाख 50 हजार रुपयांच्या विविध विकासकामांना शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज