सन 2021-22 मधील इयत्ता 6 वी साठी होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेच्या तारखेत बदल

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :-  सन 2021-22 मधील इयत्ता सहावीसाठी पूर्वी घोषित केल्याप्रमाणे दि.10 एप्रिल 2021 रोजी होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आल्याचे निजामपूर, ता.माणगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस.व्ही.बोभाटे यांनी कळविले आहे.

            आता ही निवड परीक्षा दि.16 मे 2021 (रविवार)  रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर व वेळेत घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थी व पालकांनी या बदललेल्या तारखेची नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी श्री.संतोष आर.चिंचकर, मो.9881351601, श्री.कैलास पी. वाघ, मो.9527256185यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, एस.व्ही.बोभाटे यांनी  केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत