दि.21 फेब्रुवारी ते दि.2 मार्च या कालावधीत कोविड-19 बाबत नियमांचे उल्लंघन झालेल्या ठिकाणी प्रशासनाची दंडनीय कारवाई करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे नागरिकांना आवाहन
अलिबाग,जि.रायगड, दि.3,(जिमाका) :- जिल्ह्यात दि.21 फेब्रुवारी ते दि.2 मार्च
2021 या कालावधीत कोविड-19 बाबत नियमांचे उल्लंघन झालेल्या ठिकाणी व सार्वजनिक
ठिकाणी विनामास्क आढळलेल्या नागरिकांवर केलेल्या दंडनीय कारवाईची माहिती जिल्हा
प्रशासनाकडून पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे.
भेटी
दिलेल्या ठिकाणांची एकूण संख्या-4 हजार 507, उल्लंघन आढळलेल्या ठिकाणांची एकूण
संख्या-501, दंड आकारलेल्या ठिकाणांची एकूण संख्या-307, दंडाची एकूण रक्कम-रु.1
लाख 48 हजार 240, सार्वजनिक ठिकाणी विना मास्क आढळलेल्या नागरिकांची एकूण
संख्या-482, विना मास्क आढळलेल्या नागरिकांपैकी दंड आकारलेल्या नागरिकांची एकूण
संख्या-256, विना मास्क आढळलेल्या नागरिकांकडून वसूल दंड एकूण रक्कम-रु.1 लाख 17
हजार 942.
करोना
विषयी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे, सोशल
डिस्टन्सिंगचे पालन करणे, वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे या
गोष्टींचे स्वत:साठी , स्वत:च्या कुटुंबासाठी तसेच समाजासाठी काटेकोर पालन करणे,
ही गरज बनली आहे.
तरी
नागरिकांनी शासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, करोनाचा प्रादूर्भाव
रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहनही
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment