आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 21 मार्चपर्यंत जिल्ह्यात पात्र शाळा 272 पूर्व प्राथमिक वर्गासाठी 228 तर प्राथमिक वर्गासाठी 4 हजार 08 जागा राखीव

 


 

              अलिबाग,जि.रायगड,दि.04 (जिमाका):- जिल्हयात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित व स्वंय अर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि. 3 मार्च ते 21 मार्च 2021 या कालावधीमध्ये रायगड जिल्हयात सुरु होत आहे.

आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील 272 पात्र शाळा आहेत. या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गासाठी 228 व प्राथमिक वर्गासाठी 4 हजार 08 जागा राखीव आहेत.                   

          तरी पालकांनी 25 टक्के ऑनलाईन प्रवेशाकरिता अर्ज भरण्यास सुरुवात करावी, तसेच याबाबत सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी व सर्व पात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांना आरटीई ऑनलाईन प्रवेशाबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती शीतल पुंड यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज