मार्च अखेर उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे जिल्हा कोषागार अधिकारी डॉ.फिरोज मुल्ला यांचे आवाहन

 

वृत्त क्र.241                                                                                            दिनांक:-24 मार्च,2021

 


 

अलिबाग,जि. रायगड,दि.24 (जिमाका)- माहे मार्च मध्ये आर्थिक वर्षअखेर कोषागारात सादर होणाऱ्या देयकांच्या संख्येत मोठया प्रमाणावर वाढ होते. त्यामुळे संगणक प्रणालीवर ताण येवून प्रक्रिया खंडीत होण्याची शक्यता निर्माण होते. अशा प्रकारे माहे मार्चअखेर उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. फिरोज मुल्ला यांनी केले आहे.

              कोषागार व उपकोषागार कार्यालयामध्ये दि.31 मार्च 2021 ही बीम्स प्रणालीव्दारे बीडीएस प्राधिकारपत्र काढण्यासाठीची अंतिम तारीख राहील. महाराष्ट्र कोषागार नियमावलीत नमुना 28 व 31 मध्ये सादर होणारी देयके अंतिम देयके, नियमित प्रमाणके, पावत्या जोडूनच सादर करावीत. प्रपत्र बीजक जोडून सादर केली जाणारी देयके पारीत केली जाणार नाहीत, याची नोंद घेण्यात यावी. ही देयके सादर करताना महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दि. 15 मार्च 2021 नुसार कार्यवाही करण्यात यावी.

             दि.31 मार्च 2021 रोजी सायंकाळी 06.00 वाजल्यानंतर उपकोषागार स्तरावरील आहरण व संवितरण अधिकारी यांच्या देयकाबाबतीत त्यांनी त्यांच्या जिल्हास्तरावरील आहरण व संवितरण अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा कोषागारात देयके सादर करण्याची दक्षता घ्यावी.

              मार्च अखेरीस दि.31 मार्च 2021 रोजी शासनाचा निधी अखर्चित राहू नये, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय व उपकोषागार कार्यालये दि.31 मार्च 2021 रोजी रात्री उशिरापर्यंत चालू राहतील. तसेच शासनाचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या बँका दि.31 मार्च 2021 रोजी रात्री उशिरापर्यंत उघडया ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.

              माहे मार्च महिन्यात आकस्मिक खर्च किंवा वैयक्तिक लाभधारकांसाठी सहाय्यक अनुदानाची देयके कोषागारात सादर करताना प्रत्येक आहरण व संवितरण अधिकारी यांनी शासन परिपत्रक अर्थसं 2020/ प्र.क्र .64/अर्थ-3, दि. 16 एप्रिल 2020 या परिपत्रकासोबत जोडलेल्या नमुन्यातील प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक राहील.

                कोणत्याही परिस्थितीमध्ये असे प्रमाणपत्र असल्याशिवाय कोषागार/उपकोषागारामध्ये देयके पारीत केली जाणार नाहीत. तसेच सहाय्यक अनुदानाच्या देयकांबाबतीत अनुदान वितरणाची मूळ शाईची प्रत देयकासोबत जोडणे आवश्यक आहे, असे जिल्हा कोषागार अधिकारी डॉ.फिरोज इ.मुल्ला यांनी कळविले आहे .

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत