तृतीयपंथीयांना शासनाकडून मिळणार एकरकमी रु.1 हजार 500 ची आर्थिक मदत माहिती तात्काळ देण्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांचे आवाहन

 


अलिबाग, जि.रायगड दि.06 (जिमाका) :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यामार्फत तृतीय पंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण योजनेंतर्गत कोविड-19 या महामारीच्या परिस्थितीमध्ये तृतीय पंथीय व्यक्तींना शासनाकडून एकरकमी रु.1 हजार 500  आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

त्यासाठी जिल्हयातील तृतीय पंथीय व्यक्तींची माहिती शासनाकडे कळवावयाची असून जिल्हयातील तृतीय पंथीयांनी आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर ही माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड कच्छी भवन, नमिनाथ मंदिराजवळ, सेंट मेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग, जि.रायगड येथे संपर्क करुन किंवा या कार्यालयाच्या acsworaigad@gmail.com या ई-मेल आयडी वर पाठवून किंवा समाज कल्याण निरीक्षक श्री.अंकुश पोळ यांच्याशी 7820884580 या मोबाईल नंबरवर संपर्क साधून द्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज