राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत तसेच शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे जून 2021 करिता सवलतीच्या दराने अनुदानाचा लाभ

 


 

अलिबाग, जि.रायगड,दि.28 (जिमाका):- राज्यातील करोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत तसेच शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे 2020 ते ऑगस्ट 2020 महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने (गहू 8/- रुपये प्रति किलो  व तांदूळ रुपये 12/- प्रति किलो)  प्रति माह प्रति व्यक्ती 3 किलो गहू  व 2 किलो तांदूळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्याचा लाभ देण्यात आलेला आहे.

       मात्र बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या योजनेतील अन्नधान्य शिल्लक असल्यामुळे शासन, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील दि.25 मे च्या पत्रान्वये जिल्ह्यातील शासकीय गोदामांमध्ये तसेच         रास्तभाव धान्य दुकानांमध्ये शिल्लक अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) वाटप प्रति किलो राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत तसेच शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी)

शिधापत्रिकाधारकांना प्रति माह प्रति व्यक्ती 1 किलो गहू व 1 किलो तांदूळ याप्रमाणे 2 किलो अन्नधान्य माहे जून 2021 करिता सवलतीच्या दराने (गहू 8/- रुपये प्रति किलो व तांदूळ रुपये 12/- प्रति किलो) प्रथम मागणी करणाऱ्यास देणे (FIRST COME,FIRST SERVE) या तत्त्वानुसार वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

        त्यानुसार एपीएल (केशरी) शिधापत्रिका ज्या रास्तभाव दुकानास संलग्न आहे, त्या दुकानातून आपणास देय असलेले शासन अनुदानित दराने शिधाजिन्नस लवकर प्राप्त करून घेण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक