व्यापाऱ्यांकडून जिल्हा सामान्य रुग्णालयाला मदत सामाजिक बांधिलकी जपत 24 पंखे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्याकडे केले सुपूर्द
अलिबाग, जि.रायगड दि.06 (जिमाका) :- करोनाच्या संकटात जिल्हा सामान्य
रुग्णालयातील रुग्णांसाठी अलिबागमधील व्यापारी उमेश मोरे, दिलीप जैन, सूरजकुमार यादव,
कांतीलाल जैन यांनी सामाजिक बांधिलकी जपत 24 पंखे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने
यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल फुटाणे, डॉ.अमोल भुसारे, नगरसेवक
अनिल चोपडा, रवि थोरात, गणेश मांजरेकर आदी उपस्थित होते.
उमेश मोरे, दिलीप जैन, सूरजकुमार यादव, कांतीलाल जैन हे अलिबागमधील प्रसिध्द
व्यापारी आहेत. उद्योग व्यवसाय सांभाळत असताना गरजूंना मदत करण्याचे काम ते करीत आहेत.
अनेकांना त्यांच्याकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. सध्या सर्वत्र करोनाचे सावट आहे.
अलिबागमधील जिल्हा रुग्णालयासह अन्य रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकिय
अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. या महामारीच्या संकटात जिल्हा
सामान्य रुग्णालयाला व्यापाऱ्यांनी केलेली ही मदत निश्चितच कौतुकास पात्र आहे,
सर्वांसाठी अनुकरणीय आहे.
0000000
Comments
Post a Comment