“प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना” अंतर्गत भारतीय अन्न महामंडळाकडून गहू/तांदळाचे वितरण मोफत
अलिबाग,जि.रायगड,दि.21 (जिमाका)
:- करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने केंद्र सरकार
तर्फे “प्रधानमंत्री
गरीब कल्याण अन्न योजना –III” अंतर्गत मे आणि जून महिन्यात प्रत्येक पात्र लाभार्थ्याना
पाच किलो तांदूळ /गहू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार सुमारे 17 हजार 924 मे.टन अन्नधान्याचे रायगड जिल्ह्यातील
पात्र लाभार्थीसाठी वितरण करण्यात येणार आहे.यापैकी 7 हजार 497 मे.टन धान्याची उचल
भारतीय खाद्य निगम च्या गोदामातून करण्यात आली आहे,अशी माहिती विभागीय व्यवस्थापक श्री.बाबाराव
राऊत यांनी दिली.
अन्न महामंडळ गोदामाचे काम नियमित सुरू असून गोदामात अन्नाचा साठा मुबलक
आहे. कार्यालयाचे कर्मचारी लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वांना धान्य मिळावे,यासाठी कार्यरत
आहेत.
केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष
गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या "सबका साथ,
सबका विकास आणि सबका विश्वास" या संदेशानुसार भविष्यातही हा विभाग काम करीत राहील.
000000
Comments
Post a Comment