श्रीबाग येथे अलिबाग नगरपरिषदेतर्फे उभारण्यात येणाऱ्या स्व. नमिता प्रशांत नाईक क्रीडा संकुलच्या कामाला पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली भेट
अलिबाग,जि.रायगड,दि.24(जिमाका):- येथील श्रीबाग येथे अलिबाग नगरपरिषदेतर्फे उभारण्यात
येणाऱ्या स्व. नमिता प्रशांत नाईक क्रीडा संकुलच्या कामाला पालकमंत्री कु. आदिती तटकरे
यांनी आज भेट दिली. या कामाची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. हे काम आता अंतिम
टप्प्यात असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करू देण्याबाबत नगराध्यक्ष
प्रशांत नाईक यांनी पालकमंत्री महोदयांना विनंती केली होती.
ही
मागणी मान्य करीत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आवश्यक तो निधी तात्काळ उपलब्ध करून
देण्याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
या
क्रीडा संकुलात सेमी ऑलिंपिक स्विमींग पूल, बॅडमिंटन कोर्ट, अत्याधुनिक
सोयी-सुविधांसह प्रशस्त जिम, योगा रूम, कॅरम व टेबल टेनिस रूम आदी सुविधा असणार असून
हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
यावेळी
पोलीस अधीक्षक श्री. अशोक दुधे, उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, गटनेते प्रदीप नाईक,
जिल्हा परिषद बांधकाम सभापती अजय झुंजारराव, नगरसेवक अनिल चोपडा, वृषाली ठोसर, चित्रलेखा
पाटील, संजना कीर आदी उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment