शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी दि.30 जून 2021 पर्यंत अंतिम मुदत वाढ

 


 

अलिबाग, जि.रायगड दि.16 (जिमाका) :-शासनाच्या वतीने महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2020-21 चे ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची मुदत पुन्हा वाढविण्यात आली असून दि.30 जून 2021 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करावेत. ही मुदत अंतिम असून विद्यार्थ्यांनी विहित मुदतीतच अर्ज करावेत.

  शासनामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण फी व परीक्षा फी, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यावेतन योजना, राजर्षी शाहू गुणवत्ता शिष्यवृत्ती, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती इत्यादी योजना राबविल्या जातात.  या योजनांकरिता विद्यार्थी महाडीबीटी या ऑनलाइन अर्ज करू शकतात.

    ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज केले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी तसेच ज्या विद्यार्थ्यांचे त्रुटीअभावी अर्ज प्रलंबित आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा.  मुंबई विभागातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे अर्ज त्वरित निकाली काढावेत. शिष्यवृत्तीपासून कोणी वंचित राहणार नाही, या दृष्टीने संबंधित प्राचार्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत