महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अलिबाग तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीमध्ये स्वयंसहाय्यता समूहातील महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
अलिबाग,जि.रायगड,
दि.2 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत
अलिबाग तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायत आरोग्य उपकेंद्रामध्ये अलिबाग गटविकास अधिकारी
सौ. दीप्ती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला महासमृद्धी अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता
समूहातील महिलांसाठी काल (दि. 02 जून) रोजी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबीरात उपस्थित महिलांची ऑक्सिजन लेवल, रक्तदाब आणि अॅंटीजेन तपासणी करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पाटील यांनी
उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या शिबिराकरिता ग्रामपंचायत शहापूर सरपंच महेंद्र कृष्णा
पाटील, आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय
अधिकारी डॉ. श्वेता युगेश पाटील, आरोग्य सेविका समिधा संतोष खोत, आरोग्य
सेवक के. एस. झेमसे तसेच आशा सेविका, सीआरपी विजया सतीश भगत, ग्रामसंघ अध्यक्ष मंदा
नंदकुमार पाटील आणि प्रभाग समन्वयक साईनाथ
पाटील उपस्थित होते.
००००००००
Comments
Post a Comment