ध्यास पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांचा.... आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचा महाड तालुक्यातील नवीन आरोग्य उपकेंद्र, मांडले साठी मौजे मांडले येथील शासकीय जागा हस्तांतरित
अलिबाग, जि.रायगड दि.16 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती
तटकरे यांनी जिल्ह्यातील अगदी ग्रामीण स्तरापर्यंतची आरोग्य
यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक वर्षांपासून मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांना
प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही प्रलंबितच होती.
मात्र पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत
गांभीर्याने पावले उचलत आरोग्य केंद्रांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत
तत्परतेने सुरू केली आहे.
त्याचबरोबर
आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून आरोग्य केंद्रे
कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा
प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
महाड तालुक्यातील नवीन आरोग्य उपकेंद्र, मांडले या
इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी
संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार
मौजे मांडले, ता.महाड, जि. रायगड येथील सर्व्हे नं.2/3 एकूण क्षेत्र 00-07-80 हे.आर. पैकी 0-03-00 हे.आर.ही जमीन महसूल
मुक्त व सारामाफीने ही शासकीय जमीन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अलिबाग यांच्याकडे
नवीन आरोग्य उपकेंद्र, मांडले करिता हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी
यांनी नुकतेच जारी केले आहेत.
महाड
तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने हा लोकोपयोगी
निर्णय घेण्यात आला आहे.
0000000
Comments
Post a Comment