आंबेत सावित्री पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार --पालकमंत्री कु.आदिती तटकरे

 



 

अलिबाग,जि.रायगड,दि.21(जिमाका):- रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा आणि मुख्यत्वे दक्षिण कोकणातील मुख्य प्रवेशद्वार समजला जाणारा आंबेत सावित्री पूल हा दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे संकेत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज (दि.21 जून ) रोजी पुलाच्या केलेल्या पाहणीदरम्यान दिले.

येत्या दि.26 जून रोजी 2021 या पुलावरील प्रवासाचा पहिला ट्रायल आणि इतर सर्व गोष्टींचा आढावा घेतला जाणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी यावेळी पाहणी दरम्यान सांगितले. त्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना देणारा हा आंबेत  सावित्री पूल अखेर वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे संकेत यावेळी पालकमंत्री कु.तटकरे यांनी दिले.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे  म्हणाल्या की, कोकणातील मुख्यतः मंडणगड, दापोली, खेड या तीन तालुक्यांना जोडणारा आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणारा हा मार्ग ओळखला जातो. त्यामुळे आता सर्व प्रवाशांसह, शैक्षणिक क्षेत्राशी संबंधितांना,  इतर व्यावसायिकांच्या दैनंदिन व्यवहाराला चालना मिळणार आहे. येत्या पाच वर्षात नवीन पूलाचे देखील काम हाती घेतले जाईल व उत्कृष्ट काम केले जाईल, असे सांगितले.

यावेळी मंडणगड-खेड-दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम, मुजफ्फर मुकादम, नविद भाईजान अंतुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.बामणे, श्री.राऊत, संरचना कन्स्ट्रक्शन चे श्री.जोशी, साईट इंजिनीयर लखन आदि उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज