पनवेल व कर्जत येथे मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांमध्ये जागतिक युवा कौशल्य दिन संपन्न

 


अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत पनवेल येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये (दि.15 जुलै) जागतिक युवा कौशल्य दिन साजरा संपन्न झाला.

            यामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना जिल्हा कौशल्य विकास समन्वयक रायगड-अलिबाग श्री. मोहसीन वस्ता यांच्या हस्ते इंडक्शन किट वाटप करण्यात आले.

              तसेच कर्जत येथील रायगड हॉस्पिटलमध्येही जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला साजरा करण्यात आला असून प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री. शा. गि. पवार यांच्या हस्ते इंडक्शन किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका श्रीमती स्वाती खाडे व स्मिता स्वामी उपस्थित होत्या.

             हे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त श्री. शा. गि. पवार यांनी सांगितले की, भविष्यात कोविड-19 ची तिसरी लाट निर्माण झाल्यास हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळाची गरज लागणार आहे. तसेच प्रशिक्षण घेत असताना काही अडचणी वाटल्यास भ्रमणध्वनी क्रमांक 9820452264 वर संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री. शा. गि. पवार  यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज