बँक ऑफ इंडियाला वित्तीय वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत रु.720 कोटींचा नफा
अलिबाग,जि.रायगड दि.4 (जिमाका)
:-
भारतातील अग्रगण्य बँक ऑफ इंडियाने
वित्त वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत
रु.720 कोटीचा निव्वळ नफा मिळविला आहे, अशी माहिती बँक ऑफ इंडिया रायगड विभागाच्या
विभाग प्रमुख श्रीमती शेपा विश्वास यांनी दिली आहे.
बँकेचा निव्वळ नफा
हा मार्च 2021 च्या संपलेल्या तिमाहीपेक्षा हा नफा 188 टक्क्यांनी जास्त आहे. ऑपरेटिंग
नफा मार्च 2021 च्या तुलनेत 34 टक्क्यांनी वाढून रूपये 2 हजार 806 कोटी झाला आहे.
बँकेच्या वित्त
वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत
CASA ठेवीमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 13.80 टक्के वाढ नोंदविली गेली. बँकेच्या व्याज
नसलेल्या उत्पन्नात गेल्या वर्षापेक्षा 39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकेच्या ढोबळ
थकित कर्जामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा 40 बिंदू ने घट झाली आहे. बँकेच्या निव्वळ
थकित कर्जामध्ये 3.35 टक्के ने घट झाली आहे. बँकेचे किरकोळ, कृषी आणि MSME कर्ज 11.02
टक्क्यांनी वाढले आहे. किरकोळ कर्जामध्ये 10.57 टक्के, कृषी कर्जामध्ये 11.08
टक्के, MSME कर्जामध्ये 11.45 टक्क्यांनी वाढ नोंदविली आहे. बँकेच्या जागतिक व्यवसायामध्ये
गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा 2.71 टक्के ने वाढ झाली, अशीही माहिती त्यांनी दिली
आहे.
Comments
Post a Comment