जिल्हा प्रशासनाने महाड तालुक्यातील नुकसानीची दि.26 जुलै ते 03 ऑगस्ट या कालावधीतील पंचनाम्यानुसार माहिती केली जाहीर

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.4 (जिमाका):- महाड तालुक्यात दि.22 व 23 जुलै 2021 रोजी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती व दरड कोसळण्याची घटना घडली.  त्यामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाने पंचनाम्याची कार्यवाही तात्काळ सुरु केली.  दि.26 जुलै ते 03 ऑगस्ट  या कालावधीत करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार प्राप्त झालेली नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.  पंचनाम्याची कार्यवाही अजूनही सुरु आहे.

पंचनाम्याच्या कार्यवाहीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

महाड तालुक्यातील नुकसानीबाबतची दि.26 जुलै ते 03 ऑगस्ट 2021 या कालावधीतील पंचनाम्यानुसार प्राप्त माहिती पुढीलप्रमाणे-

महाड शहरातील बाधित झालेल्या घरांची संख्या-9 हजार 225, एकूण झालेल्या पंचनाम्यांची संख्या 6 हजार 471,  ग्रामीण विभागातील बाधित झालेल्या घराची संख्या- 5 हजार 343, एकूण झालेल्या पंचनाम्यांची संख्या 5 हजार 911.  

एकूण बाधित कुटुंब संख्या 14 हजार 368, त्यापैकी पंचनामे  झालेली  कुटुंबे 11 हजार 104, पंचनामे शिल्लक असलेली कुटुंबे संख्या 3 हजार 264, अंशतः नुकसान झालेली घरे 9 हजार 695, पूर्णत: नुकसान झालेली घरे 91, गोठे/वाडा 67, दुकाने 1 हजार 251, मंदिर  1, अंगणवाडी  1, शाळा  2, सार्वजनिक मालमत्ता 3, मोठी जनावरे 199, छोटी जनावरे 23,  बकरी  69,कोंबड्या 257, शेती विविध प्रकारचे नुकसान क्षेत्र 178.08 हे.आर, एकूण बाधित शेतकरी संख्या 957.

पोलादपूर तालुक्यातील नुकसान व इतर बाबींविषयीची माहिती :- संपूर्ण आर्थिक नुकसान– 2  कोटी 60 लाख रुपये, शेतीचे नुकसान -282 हेक्टर,  शेतीचे नुकसान - 2 कोटी 40 लाख रुपये, एकूण मृत संख्या - 11 व्यक्ती - मृतांच्या वारसांना रुपये 4 लाख वितरित करण्यात आले आहेत. एकूण जखमी व्यक्ती- 24 जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरड क्षेत्रातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी केवनाळे व आंबेमाची गावात शासनाकडून जागा निश्चित करण्यात आली आहे, पूर्णतः नुकसान झालेली घरे – 10, अंशतः नुकसान झालेली घरे – 570, पडझड झालेले गोठा-वाडा - 46, मोठी जनावरे मृत -10, एकूण निवारा केंद्र – 8, त्यात व्यक्ती 340, एकूण 88 गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झालेला होता त्यापैकी 77 गावांमध्ये विद्युत पुरवठा पूर्ववत झाला आहे, पोलादपूर तालुक्यामधील एकूण 14 पूल व 21  साकव यांचं नुकसान झाले असून आत्तापर्यंत 12 पूल व 17 साकव यांची दुरुस्ती करून त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे.

०००००

 

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक