आयकर विभागामध्ये खेळाडूंच्या भरतीबाबत जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून होणार क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी

 


अलिबाग,जि.रायगड,दि.6 (जिमाका): केंद्र शासनाच्या आयकर विभागाव्दारे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूंकरीता विविध पदांच्या खेळाडू भरतीचा कार्यक्रम प्रसिध्द झाला आहे. एकूण 22 खेळ प्रकारातील खेळाडूंसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.

 या भरतीची सविस्तर जाहिरात व माहिती www.incometaxmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या भरतीसाठी ज्या खेळाडूंनी भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे, असे खेळाडू पात्र ठरणार आहेत. संबंधित खेळाडूंची शालेय राष्ट्रीय स्पर्धेमधील कामगिरी, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे प्रमाणित करून देण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यातील ज्या खेळाडूंनी शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड-अलिबाग यांच्याकडे अर्ज सादर करावेत. जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे Form-4 भरुन, स्पर्धा प्राविण्य प्रमाणपत्रासह अर्ज सादर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.20 ऑगस्ट 2021 अशी राहील. याबाबत अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी श्री.सचिन निकम, मो.क्र.8856093608 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी  श्रीम.अंकिता मयेकर यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज