अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेतील शिकाऊ उमेदवारांनी प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरिता कागदपत्रे जमा करावीत
अलिबाग,जि.रायगड,दि.02(जिमाका):-
अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 105 वी (एप्रिल 2017), 106 वी (ऑक्टोबर
2017) आणि 107 वी एप्रिल 2018) शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक
सूचना केंद्र पनवेल येथे झालेल्या परिक्षेमधील ज्या उमेदवारांचे Contract
Registration Offline झालेले आहे, अशा उमेदवारांचे अंतिम प्रमाणपत्र त्यांच्या
Contract Registration संबंधातील कागदपत्रांची पूर्तता न झाल्याकारणाने कार्यालयात
उपलब्ध झालेले नाहीत.
त्या
संबंधीत प्रशिक्षणार्थ्यांनी प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरिता प्रशिक्षणार्थ्यास दिलेल्या
गुणपत्रिका, आस्थापनेकडील Offline Contract form, प्रशिक्षणार्थ्यांना मिळालेल्या स्टायपेंडची
नोंद असलेले संपूर्ण कालावधीचे आस्थापनेकडील Bank Statement ही कागदपत्रे कार्यालयात
स्वतः उपस्थित राहून अथवा आपण ज्या आस्थापनेमध्ये आपले शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केले
आहे, त्या आस्थापनेशी संपर्क साधून आस्थापनेमार्फत सर्व कागदपत्रे कार्यालयीन दिवशी
कार्यालयीन वेळेत जमा करावी, असे सहाय्यक प्रशिक्षण सल्लागार, मूलभूत प्रशिक्षण तथा
अनुषंगिक सूचना केंद्र, पनवेल श्री.वि.द.टिकोले यांनी कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment