माणगाव येथील दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) च्या न्यायिक अधिकाऱ्याच्या निवासस्थानासाठी भाडेतत्वावर जागा घेण्यास मा.मुंबई उच्च न्यायालयाची मान्यता

 


अलिबाग,जि.रायगड,दि.4 (जिमाका):- दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर), माणगाव या न्यायालयाच्या न्यायिक अधिकाऱ्याच्या निवासस्थानासाठी भाडेतत्वावर जागा घेण्यास मा.उच्च न्यायालयाने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे.

मा.मुंबई उच्च न्यायालयाने माणगाव येथे दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू करण्याकरिता नुकतीच तत्वतः मान्यता दिली होती. हे पालकमंत्री कु.आदिती  तटकरे यांनी बार असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य व सर्वसामान्य पक्षकारांची मागणी पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचेच यश आहे.

खासदार सुनिल तटकरे यांनी ते स्वत: राज्य मंत्रिमंडळात मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात माणगाव येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय स्थापन करण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच माणगाव अतिरिक्त जिल्हा न्यायालयाची इमारत व माणगाव येथे जिल्हा न्यायालय सुरू झाले.

माणगाव, श्रीवर्धन, रोहा व सुधागड-पाली येथील बार असोसिएशनमार्फत माणगाव येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू करण्याकरिता विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यांनी शासनाकडे वस्तुस्थिती मांडून जनतेच्या व सर्वसामान्य पक्षकारांना न्याय मिळवून देण्याकरिता माणगाव येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्याकरिता शासनाकडून आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.

 माणगाव येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय कार्यरत झाल्यानंतर महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा व पाली या तालुक्यांमधील जनतेला याचा लाभ होणार आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत