कौशल्य स्पर्धेकरीता इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करण्याचे आवाहन

 


 

अलिबाग,जि.रायगड, दि.12 (जिमाका):- सन 2021-22 मध्ये आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 47 क्षेत्रांशी संबधित जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, Sector Skill Council, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने Skill Competition आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा आयोजित करण्याबाबत राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद  (NSDC- National Skill Development Council) मार्फत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील. जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन दि.17 व दि.18 ऑगस्ट2021 या कालावधीत संबंधीत जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालयांच्या ठिकाणी आयोजन करण्यात येईल.

या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर करून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, 'महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास स्पर्धा 2021' च्या माध्यमातून राज्यातील युवक आणि युवतींना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी एक उत्तम मंच उपलब्ध करून देत आहे, याचा जास्तीत जास्त युवक आणि युवतींनी लाभ घ्यावा तसेच जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन दि. 17 व 18 ऑगस्ट 2021  या कालावधीत संबंधीत जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालय यांच्या ठिकाणी आयोजित करण्यात येईल. या स्पर्धेतील अभ्यासक्रमांची यादी पाहण्यासाठी तसेच कौशल्य स्पर्धा सहभाग नोंदणीसाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScc9hV8zb9eIBlPWfEYny_XK0485eibd8vzLbX24LphXPQDw/viewform ही लिंक उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांनी स्पर्धेतील सहभागासाठी नोंदणी करण्याकरीता सोबत देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून आपली परिपूर्ण माहिती भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समिती, रायगड-अलिबाग  श्रीमती निधी चौधरी व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आयुक्त श्री. शा.गि. पवार, यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज