आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र बोधचिन्ह (LOGO) स्पर्धा जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन

 


अलिबाग,जि.रायगड,दि.6 (जिमाका): राज्याची क्रीडा विषयक कामगिरी जास्तीत जास्त उंचाविण्याकरिता क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिक्षणाची क्षेत्रे विचारात घेवून, नोकरीच्या जास्तीत संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास व्यावसायिक दृष्टीने प्रोत्साहन मिळावे, यानुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊन, खेळाडूंना तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळावे, हा राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ निर्मितीचा उद्देश आहे.

याच उद्देशाने शासनाने राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र स्थापन केले आहे. या आंतरराष्ट्रीय क्रीडा विदयापीठाचे बोधचिन्ह (LOGO) निश्चित करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असून, या स्पर्धेच्या नियम, अटी व पुरस्कार विषयक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

या स्पर्धेत भारतातील नागरिक भाग घेवू शकतात, तसेच या स्पर्धेसाठी हे बोधचिन्ह तयार करुन सादर करण्याचा अंतिम दि.10 ऑगस्ट, 2021 असा राहील.

या स्पर्धेतील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमाकांच्या विजेत्यांना रु.50 हजार, रु.30 हजार व रु. 20 हजार पारितोषिक प्रदान करण्यात येईल. जिल्हयातील कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये, कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील महाविद्यालये, विद्यापीठांमधील इच्छुक विद्यार्थी व नागरिकांनी आपला जास्तीत जास्त सहभाग या स्पर्धेमध्ये द्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड श्रीम.अंकिता मयेकर यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत