पनवेल पंचायत समिती येथे जल सुरक्षकांनी घेतली स्वच्छता शपथ बैठक व प्रशिक्षणही संपन्न

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.20 (जिमाका): स्वच्छता ही सेवा अभियानाची जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता डॉ.ज्ञानदा फणसे यांच्या मार्गदर्शनाखाली गतीने अंमलबजावणी  सुरू आहे. त्यानुषंगाने आज पनवेल पंचायत समिती येथील सभागृहात गटविकास अधिकारी श्री.संजय भोये  यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील जल सुरक्षकांची बैठक व प्रशिक्षण संपन्न झाले.

यावेळी संवाद तज्ञ श्री.सुरेश पाटील यांनी स्वच्छता ही सेवा अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत माहिती दिली. यामध्ये गावात श्रमदान मोहीम राबविणे, घर तिथे शोषखड्डा तयार करणे, सार्वजनिक इमारतींची स्वच्छता व प्लास्टिक संकलन ,भिंती रंगविणे व घोषवाक्य लिहणे, odf plus ठराव घेणे आदी उपक्रमांची चर्चा झाली.  यावेळी उपस्थितांना स्वच्छता ही सेवा अभियानाची शपथ दिली .

 यावेळी मार्गदर्शन करताना गट विकास अधिकारी श्री.संजय भोये म्हणाले की, पाणी दूषित होणार नाही, यासाठी टीसीएलचा  योग्य वापर करा व पाणी  नमुने गोळा करून वेळेत प्रयोग शाळेत पाठविले जातील याची दक्षता घ्यावी. पाण्याचे स्त्रोत सुरक्षित असतील त्तर शुद्ध व स्वच्छ पाणी नागरिकांना मिळेल. माहितीची योग्य प्रकारे नोंद ठेवणे गरजेचे आहे. स्वच्छता ही सेवा अभियानामध्ये   सर्वांचा लोकसहभाग घेऊन पनवेल तालुक्यात जास्तीत जास्त श्रमदान व शोषखड्डे होतील असे सूक्ष्म नियोजन केले आहे.

जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार श्रीमती आदिती मगर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पाणी गुणवत्तेचे महत्व सांगितले. अनुजैविक व रासायनिक तपासणी विहित नमुन्यातील व कालावधीत पूर्ण करावी व ग्रामपंचायतीला ग्रीन कार्ड दर्जा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, असे सांगितले. या बैठकीत पाणी योजना व जलस्त्रोत सुरक्षितपणाबाबत गावनिहाय आढावा घेण्यात आला.

यावेळी विस्तार अधिकारी श्रीमती मीनल कनोजे, गट समन्वयक श्री.ओंकार पाटील, समूह समन्वयक  मनीषा  साळवे  व पनवेल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे जल सुरक्षक उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक