नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महिलांसाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून घेतलेल्या कोविड-19 विशेष लसीकरण मोहिमेस उत्तम प्रतिसाद एकूण 307 लसीकरण केंद्रावर 12 हजार 599 महिलांनी घेतला विशेष कोविड लसीकरण मोहिमेचा लाभ

 

 

अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका):-  नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील 18 वर्षावरील सर्व महिलांसाठी आज सोमवार, दि.11 ऑक्टोबर 2021 रोजी राबविण्यात आलेल्या “महिला विशेष कोविड लसीकरण” मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात एकूण 307 लसीकरण केंद्रावर 12 हजार 599 महिलांनी या विशेष कोविड लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला.

मिशन कवच कुंडल” अंतर्गत या “महिला विशेष कोविड लसीकरण” उपक्रमास संपूर्ण जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात पनवेल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उलवे, नारपोली प्राथमिक आरोग्य केंद्र, आजिवली  पनवेल महानगरपालिका क्षेत्र, माणगाव तालुक्यातील  माणगाव नगरपंचायत क्षेत्र, कर्जत,  रोहा तालुक्यातील आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, मुरुड तालुक्यातील मुरुड ग्रामीण रुग्णालय, अलिबाग तालुक्यातील चेंढरे, उरण तालुक्यातील मौजे वेश्वी, दादरपाडा, श्रीवर्धन नगरपरिषद क्षेत्र, म्हसळा नगरपंचायत क्षेत्र, खोपोली नगरपरिषद क्षेत्र, पेण नगरपरिषद क्षेत्र यासह जिल्ह्यातील इतर शहरी व ग्रामीण भागातील लसीकरण केंद्राचाही समावेश आहे.

अशा प्रकारची “महिला विशेष कोविड लसीकरण” मोहीम राबविल्याबद्दल जिल्ह्यातील महिलांनी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे विशेष आभार मानले आहेत.  

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज