दिघी येथील टपाल कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी खासदार सुनिल तटकरे यांचे प्रयत्न

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.26 (जिमाका):- श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे पूर्ण क्षमतेने टपाल कार्यालय सुरू व्हावे यासाठी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. सुनिल तटकरे यांनी मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरिष अग्रवाल, नवी मुंबईचे पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेशरकर तसेच श्रीमती शरण्या मॅडम - संचालक पोस्टल सुविधा यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी साजिद करजीकर, सनाउल्लाह फिरफिरे व ग्रामस्थही उपस्थित होते.

नागरिकांना अधिक प्रभावी व जलद टपाल सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी हे टपाल कार्यालय पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरू होणे आवश्यक असल्याचे खा. तटकरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यांची मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची हमी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज