होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या संयुक्त विद्यमाने मानसेवी होमगार्ड सदस्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका):- महाराष्ट्र
राज्य होमगार्ड दलाचे उपमहासमादेशक अपर पोलीस महासंचालक ब्रिजेशसिंह यांच्या
मार्गदर्शनानुसार होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या संयुक्त विद्यमाने मानसेवी
होमगार्ड सदस्यांसाठी दि. 28 ऑक्टोबर ते
30 ऑक्टोबर 2021 या कालावधीत जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड, रायगड-अलिबाग येथे
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी
डॉ. महेंद्र कल्याणकर तसेच पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे यांच्या हस्ते होणार आहे.
या प्रशिक्षणाकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. सागर पाठक यांचे
मार्गदर्शन लाभणार आहे. हे प्रशिक्षण सत्र अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक,
होमगार्ड श्री.अतुल झेंडे यांच्या नियंत्रण व देखरेखीखाली संपन्न होणार आहे.
Comments
Post a Comment