पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगाव व तळा नगरपंचायत हद्दीतील मतदान केंद्र असणाऱ्या शाळांना दि.20 व दि.21 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर

 


अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका):- माहे एप्रिल, 2020 ते माहे मे, 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या 81 व माहे डिसेंबर 2021 मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या 18 तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2020-21 जाहीर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगाव व तळा या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दि.21 डिसेंबर 2021 (मंगळवार) होणार आहे.

पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगाव व तळा नगरपंचायतीच्या मतनोंदणीकरिता मतदानाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच दि.20 डिसेंबर 2021 रोजी मतदान केंद्रावर मतदान अधिकारी/कर्मचारी पोहोचणार आहेत. त्यामुळे दि.20 डिसेंबर व दि.21 डिसेंबर 2021 रोजी पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगाव व तळा नगरपंचायत हद्दीतील मतदान केंद्र असणाऱ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जाहीर केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज