भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'स्वाधार योजना' विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत - सहाय्यक आयुक्त श्री. सुनिल जाधव

 


अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आपले परिपूर्ण अर्ज डिसेंबर 2021 पर्यंत समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्री.सुनिल जाधव यांनी केले आहे.

महानगरपालिका हद्दीपासून 5 किलोमीटर पर्यंत क्षेत्रातील व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी महाविदयालयातील प्रवेशित विदयार्थ्यांनी सन 2020-2021 व 2021-2022 या दोन वर्षाच्या शैक्षणिक कालावधीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना कोविड-19 च्या प्रादूर्भाव कालावधीमध्ये स्वाधार योजनेचा लाभ घेताना खालील बाबींचे उपस्थिती प्रमाणपत्र सादर करावे.

या कालावधीमध्ये संस्था / महाविद्यालये प्रत्यक्ष बंद असल्या तरी सन 2020-2021 व 2021-2022 या दोन वर्षाच्या शैक्षणिक कालावधीमध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारे ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज डिसेंबर 2021 अखेर सादर करावेत. शासन निर्णयानुसार सहामाही उपस्थिती 75 टक्के असणे आवश्यक आहे. परंतु ऑनलाईन प्रणालीद्वारे / पद्धतीद्वारे शिक्षण सुरु होते, त्यामुळे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी ते शिकत असलेल्या शैक्षणिक संस्था / महाविद्यालये यांच्याकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे सहामाही 75 टक्के उपस्थिती असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे.

कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे सन 2020-2021 व 2021-2022 या दोन वर्षाच्या शैक्षणिक कालावधीमध्ये संस्था / महाविद्यालये प्रत्यक्ष बंद असल्याने संबंधित विद्यार्थ्यांनी भोजन निवास, निर्वाह भत्ता व इतर शैक्षणिक सुविधा ज्या विद्यार्थ्यांनी स्वतः उपलब्ध करुन घेतले आहे अथवा खोली भाड्याने घेवून ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण घेत असतील तर अशा पात्र विद्यार्थ्यांनी डिसेंबर 2021 अखेर कच्छी भवन नमिनाथ जैन मंदिराजवळ, सेंट मेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग, दूरध्वनी क्र.: (02141-222288) ईमेल: acsworaigad@gmail.com या कार्यालयाकडे परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्री.सुनिल जाधव यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत