आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्ह्यातील युवतींकरिता स्वसंरक्षण प्रशिक्षण व प्रात्यक्षिके कार्यक्रम संपन्न

 

 

अलिबाग,जि.रायगड,दि.24(जिमाका) :- आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रायगड अलिबाग, प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग येथे (दि.22 डिसेंबर 2021) रोजी जिल्ह्यातील युवतींकरिता स्वसंरक्षण प्रशिक्षण व प्रात्यक्षिके कार्यक्रम संपन्न झाला.

            या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती अंकिता मयेकर, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.

 जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक युवतींशी संवाद साधताना म्हणाले की, प्रत्येक गोष्टी करताना स्वतःला सिद्ध करणे म्हणजे स्वयंसिद्धा, वैयक्तिक स्वातंत्र्य हे फार महत्त्वाचे असते.  सध्या युवा पिढीचे फिजिकल, सायकॉलॉजिकल, सोशल, इमोशनल डेव्हलपमेंट होणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक युवतीला स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे. याकरिता जिल्हा क्रीडा कार्यालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये  असताना  राबवलेल्या ब्लॅक कॅट- महिला स्वसंरक्षण पथक या संकल्पनेविषयी माहिती देखील उपस्थित विद्यार्थीनींना दिली.

राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी-आंतरराष्ट्रीय खेळाडू तपस्वी गोंधळी यांनी उपस्थित मुलींना स्वसंरक्षणाचे काही मूलभूत उपयुक्त डावपेच शिकवले व  त्याची प्रात्यक्षिके करून दाखविली. सध्याच्या युगामध्ये स्वसंरक्षण गरजेचे आहे,  याचे महत्त्व देखील त्यांनी विद्यार्थिनींना सांगितले. संकट कधीही कोणावरही येऊ शकते आपण नेहमीच सतर्क असले पाहिजे. स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःला सज्ज होण्याची वेळ आता आलेली आहे, केवळ स्वतःचे संरक्षण नाही तर आपल्याला स्वतःबरोबर इतरांचे देखील संरक्षण करता आले पाहिजे. मात्र जर आपण स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम नसू तर दुसऱ्याला मदत करता येणार नाही.  त्यामुळे किमान  टेक्निक्स प्रत्येक युवतीला माहिती असायला हव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले. शेवटी उत्कृष्ट प्रात्यक्षिके केलेल्या युवतींचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले.

000000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज