आयुक्त (कृषी) धीरज कुमार यांनी घेतली विविध प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांची भेट
अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- आयुक्त (कृषी)
धीरज कुमार यांनी दि.26 डिसेंबर 2021 रोजी अलिबाग तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी डॉ.संदेश
पाटील (पालांबे) यांच्या फळबागेत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी/ संस्था यांचे प्रतिनिधी
व इतर शेतकरी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे समस्या
जाणून घेतल्या व त्यावर मार्गदर्शनही केले.
तसेच
त्यांनी अलिबाग येथील पांढरा कांदा उत्पादक गटास भेट दिली. त्यावेळी गटाचे अध्यक्ष
सचिन पाटील, उपाध्यक्ष विकास पाटील, प्रगतशील शेतकरी सतीश म्हात्रे व इतर शेतकऱ्यांशी
चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पांढरा कांदा भौगोलिक नामांकनाचा जास्तीत
जास्त शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढवून
तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र पांढरा कांदा उत्पादनाखाली आणावे, शेतकरी ते थेट ग्राहक
विक्री करावी, तसेच जास्तीत जास्त कांदा निर्यात होईल, असे पाहावे असेही श्री.धीरज
कुमार यांनी सांगितले.
याशिवाय
श्री.धीरज कुमार यांनी नागाव येथील श्री.अनिल विष्णू पाटील यांच्या शेतावरील महाराष्ट्र
रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या सुपारी लागवडीची पाहणी केली व लवकरच महाराष्ट्र
ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड योजनेंतर्गत ड्रॅगनफ्रूट, अॅव्हाकॅडो व इतर नवीन
फळांचा समावेश करण्यात येईल, असे सांगितले.
या
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम.उज्वला बाणखेले, उपसंचालक (कृषी) श्री.दत्तात्रेय
काळभोर, कृषी विकास अधिकारी श्री.लक्ष्मण खुरकुटे, अलिबाग उपविभागीय कृषी अधिकारी श्री.कैलास
वानखेडे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment