ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर करोना व ओमिक्रॉन व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी, डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन

 

 

अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका):-  ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग तालुक्यातील पर्यटकांची वाढती संख्या व करोना व ओमिक्रॉन व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या आहेत.

विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर सक्त दंडात्मक कारवाई करण्यात येईल. हॉटेल, कॉटेजेस, व्यापारी व परिवहन क्षेत्रात कार्यरत सर्व संघटनांच्या अध्यक्षांची बैठक घेऊन कोव्हिड-19 साथरोगाबाबत शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांचे पालन करण्याबाबत सूचना तहसिलदार अलिबाग श्रीम. मीनल दळवी यांनी दिल्या आहेत.

 या आदेशांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापना यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी या साथरोगापसून संरक्षण करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे इ. कोव्हिड अनुरुप आदेशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज