कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना विविध दाखल्यांचे वाटप
अलिबाग,दि.10(जिमाका):- आदिवासी कातकरी उत्थान कार्यक्रम व स्वातंत्र्याच्या अमृत वर्ष महोत्सवानिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांच्या
हस्ते आदिवासी बांधवांना जातीचे दाखले, शिधापत्रिका, ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी
डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी
अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुषमा
सातपुते, तहसिलदार सचिन शेजाळ, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार उपस्थित होते.
०००००००
Comments
Post a Comment