दि.15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त जिल्ह्यात साजरे होणार विविध उपक्रम



अलिबाग,दि.14 (जिमाका):- शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दि.15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा करण्याबाबत कळविले आहे. शासनाने यावर्षी Fair Digital Finance ही संकल्पना निश्चित केली आहे.

त्यानुसार या दिवशी जिल्हा, तालुका व गाव पातळीवर स्थानिक सणाच्या वेळी ग्रामीण चित्ररथाव्दारे जनजागृती करणे, ग्रामीण भागात साईनबोर्ड, भित्तीपत्रके, होर्डिंग्ज इत्यादी द्वारे स्थानिक भाषेमध्ये संदेश देणे, नुक्कड नाटक, पथनाट्य, पपेट शोज, रागिणी नौटंकी, पांडवानी इत्यादी द्वारे जनजागृती करणे, शाळेमध्ये प्रदर्शन व ग्राहक जनजागृती बाबत शिबिरे आयोजित करणे, हँडबिल्स /पॅम्प्लेटस तयार करुन ग्रामीण भागात तसेच शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वाटप करणे, या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

अलिबाग तालुक्यातील मुख्य समुद्रकिनाऱ्यावर सकाळी 11.00 वा चित्ररथाद्वारे ग्राहकांचे हक्काबाबत प्रबोधन करण्यात येणार असून हा चित्ररथ तालुक्यातील ग्रामीण भागात फिरविण्यात येणार आहे. तसेच अलिबाग समुद्र किनारी पथनाट्याद्वारे ग्राहकांचे हक्काविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यात गाव पातळीवर तालुका स्तरीय सर्व शासकीय व इतर विभागाने दि.15 मार्च 2022 रोजी जागतिक ग्राहक हक्क दिवस साजरा करण्याचे सूचना सर्व तालुक्यांना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध स्तरांवरून प्रयत्न केले जात आहेत.

तरी सर्व ग्राहकांनी आपले हक्क जाणून घेवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन (खरेदी विक्री) व्यवहार करावेत आणि ऑनलाईन व्यवहार करताना दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज