जी.डी.सी.ए आणि सी.एच.एम 2022 परीक्षा दि.27, 28 व 29 मे 2022 रोजी


अलिबाग,दि.15 (जिमाका):- जी.डी.सी.ए आणि सी.एच.एम 2022 परीक्षा दि.27, 28 व 29 मे 2022 रोजी घेण्यात येणार असल्याचे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील दि.10 फेब्रुवारी 2022 या पत्रानुसार कळविण्यात आलेले आहे.

या परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:- शुक्रवार, दि.27 मे 2022 रोजी विषय- सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन (मॅनेजमेंट ऑफ को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी), गुण- 100, वेळ- सकाळी 10 ते दुपारी 01.00, विषय- जमाखर्च (अकाउंट्स), गुण- 100, वेळ- दुपारी 02.00 ते 05.00, शनिवार, दि.28 मे 2022 रोजी विषय- लेखापरीक्षण (ऑडिटिंग), गुण- 100, वेळ- सकाळी 10.00 ते दुपारी 01.00, विषय- सहकाराचा इतिहास, तत्वे व व्यवस्थापन (हिस्ट्री, प्रिन्सिपल्स ॲण्ड मॅनेजमेंट इन को.ऑपरेशन), गुण- 100, वेळ- दुपारी 02.00 ते सायंकाळी 05.00, रविवार दि.29 मे 2022 रोजी विषय- सहकारी कायदा व इतर कायदे (को.ऑपरेटिव्ह लॉज् ॲण्ड अदर लॉज) गुण- 100, वेळ- सकाळी 10.00 ते दुपारी 01.00, विषय- सहकारी बँक संस्था व इतर वित्तीय संस्था (को.ऑपरेटिव्ह बँकिंग ॲण्ड क्रेडिट सोसायटीज), गुण- 100, वेळ- दुपारी 02.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत.

तरी संबंधितांनी या वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ.सोपान शिंदे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज