पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर यांची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी घेतली सदिच्छा भेट

 


अलिबाग,दि.13(जिमाका):- विंचूदंशावरील औषधोपचारासाठी संशोधनात्मक उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाड येथील डॉ.हिम्मतराव बावस्कर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यानिमित्त आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी डॉ. बावस्कर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि डॉ. बावस्कर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

या भेटीत पालकमंत्री कु.तटकरे यांनी पद्मश्री डॉ.बावस्कर यांचा विंचूदंशावरील औषधोपचाराचा संशोधनात्मक प्रवास जाणून घेतला आणि आपण रायगडकर असल्याचा अभिमान वाटतो, या शब्दात आनंद व्यक्त केला.

यावेळी महाड नगराध्यक्ष स्नेहल जगताप, सुप्रसिद्ध निवेदक संजय भुस्कुटे, डॉ. बावस्कर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

00000

 

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज