आपत्ती सुरक्षेबाबत जागरूक व प्रशिक्षित असणे काळाची गरज - प्रियदर्शनी पाटील

  


अलिबाग,दि.29 (जिमाका):- निसर्गाच्या बदलामुळे विविध आपत्तींचा सामना आपल्याला करावा लागत असल्याने प्रत्येक व्यक्ती आपत्ती सुरक्षेबाबत जागरू व प्रशिक्षित असणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रियदर्शनी पाटील यांनी नुकतेच येथे केले.

अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत नुकतेच आपत्ती प्रशिक्षण शिबीर पार पडले. यावेळी प्रियदर्शनी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील, सरपंच स्वाती सतीश पाटील, उपसरपंच प्रणिता म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे, योग शिक्षक सुहास गानू, ग्रामसेवक निलेश गावंड उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील यांनी महिलांची स्वयंपाक घरातील गॅस, वीज, गिझर, पाणी यांची सुरक्षा यासह विविध अपघात व अन्य आपत्तीप्रसंगी 108 सुविधेचा मोफत वापर, ज्येष्ठ व्यक्ती, कामगार यांची सुरक्षा याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.

या कार्यक्रमास अनिता शेंडे, अहिल्या पाटील, ममता मानकर, ग्रामपंचायत सदस्य रोहन पाटील, प्रा.जोगळेकर, आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा मित्र पूजा पेडणेकर, विकास रणपिसे व अंगणवाडी सेविका वर्षा चांदोरकर, मीना गोंधळी, आराधना जोशी, रुपाली आंबेतकर हे उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज