अलिबाग मुरुड-जंजिरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केले पथनाट्य कलाकारांचे कौतुक

"आपला महाराष्ट्र, आपले सरकार"..."दोन वर्षे जनसेवेची..महाविकास आघाडीची" च्या माध्यमातून होत असलेल्या लोकजागरास दिल्या शुभेच्छा

 

अलिबाग,दि.13(जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय,रायगड अलिबाग तसेच स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था,रोहा, प्रिझम सामाजिक विकास संस्था,अलिबाग व अरुणोदय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था, म्हसळा या कलापथकांच्या माध्यमातून शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांची जनजागृती संपूर्ण रायगड जिल्ह्यात सुरू आहे. या पथनाट्य सादरीकरणातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना राज्य शासनाने राबविलेल्या योजना, त्याची फलश्रुती त्याचबरोबर रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने घेतलेल्या विविध लोकोपयोगी निर्णयांची माहिती देण्यात येत आहे.   

अशा प्रकारे विविध शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसाराचे उत्तम काम करणाऱ्या स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्थेच्या कलाकारांचे अलिबाग मुरुड जंजिरा विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुष्पगुच्छ देवून कौतुक केले व पुढील कार्यक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

पथनाट्याचे नेतृत्व स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता काशिनाथ साळवी करीत असून या पथनाट्यात दहा कलाकार सहभागी झाले होते. या पथनाट्यातून रायगड जिल्ह्यातील 21 ठिकाणी "दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची" या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचे सुचिता साळवी यांनी सांगितले.

 

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज