आंबेत पूल दुरुस्तीच्या कामाकरिता सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुढील दोन महिन्यांकरिता राहणार बंद

अलिबाग,दि.23(जिमाका):- कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील सावित्री खाडीवरील कि.मी.0/800 मधील आंबेत पूल दुरुस्तीच्या कामाकरिता सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुढील दोन महिन्यांकरिता बंद करणे आवश्यक असल्याची जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची खात्री पटल्याने त्यांनी दि.04 मार्च 2022 पासून दोन महिन्यांकरिता हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

यापूर्वी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील सावित्री खाडीवरील कि.मी. 0/800 मधील आंबेत पूल हा सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्याबाबत केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी (1) मंडणगड व दापोली येथून मुंबई पुणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी म्हाप्रळ महाड रस्ता व दापोली लाटवण करंजाडी महाड (2) मुंबई व पुणे येथून मंडणगड व दापोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महाड म्हाप्रळ मंडणगड व महाड करंजाडी लाटवण दापोली या पर्यायी मार्गाने मार्गस्थ करता येईल, असे अभिप्राय दिलेले आहेत व त्यानुसार हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे.

म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील सावित्री खाडीवरील कि.मी. 0/800 मधील आंबेत पूल हा एकूण 376 मीटर लांबीचा मोठा पूल आहे. हा पूल जवळजवळ 43 वर्ष जुना असून, पुलाचा पाया कमकुवत झाल्याने अधीक्षक अभियंता, संकल्पचित्र मंडळ (पूल) यांनी सूचविल्याप्रमाणे पूलाच्या पायाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे, असे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत