कौटुंबिक न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष चर्चासत्राचे यशस्वी आयोजन

  

अलिबाग, दि.10 (जिमाका):- कौटुंबिक न्यायालय, रायगड-अलिबाग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कौटुंबिक न्यायालय येथे दि.08 मार्च 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष चर्चासत्राचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना निरोगी कौटुंबिक नातेसंबंध-काळाची गरज आणि आव्हाने अशी होती.

या चर्चासत्रात कौटुंबिक वादासंबंधी कायदे आणि कुटुंब व विवाहसंस्था या विषयावर अॅड.मानसी म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. तसेच कौटुंबिक वादाचे लहान मुलांवर होणारे परिणाम या विषयावर अॅड.झेमसे यांनी मार्गदर्शन केले. निरोगी कौटुंबिक नातेसंबंध काळाची गरज आणि आव्हाने या विषयावर श्रीमती सुचेता मेहंदळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कौटुंबिक न्यायालय, रायगड-अलिबाग न्यायाधीश श्रीमती ए.ए. शिंदे यांनी कौटुंबिक न्यायालयाची भूमिका आणि दृष्टीकोन याबाबत आपली मते मांडली. त्याचबरोबर वैकल्पिक वाद निवारण केंद्राची भूमिका याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग सचिव श्री.एस.व्ही स्वामी यांनी आपली भूमिका मांडली.

या कार्यक्रमासाठी लॉ कॉलेजचे विद्यार्थी, जे.एस.एम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी, एन.जी.ओ प्रतिनिधी, वकील महिला व इतर सहभागी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रभारी प्रबंधक, कौटुंबिक न्यायालय, रायगड-अलिबाग श्री.जी.जे.गायकर यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवाह समुपदशेक, कौटुंबिक न्यायालय, रायगड-अलिबाग सौ.एस.ए.पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी न्यायालयातील सहाय्यक अधिक्षक सौ.एस.आर. गावडे तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज