Eat Right India कार्यक्रमांतर्गत खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी Hygiene Rating व Eat Right Campus चे मानांकन प्राप्त करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अलिबाग, दि.17 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील हॉटेल/रेस्टॉरंट त्याचप्रमाणे कंपनी, दवाखाने व शैक्षणिक संस्थेतील कॅन्टीन या आस्थापना चालकांनी आपल्या व्यवसायानुसार Hygiene Rating / Eat Right Campus चे मानांकन प्राप्त करून घ्यावे. त्यानुषंगाने काही अडचण आल्यास अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, रायगड-पेण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायदा हा दि.05 ऑगस्ट 2011 पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला असून या कायद्याचा प्रमुख उद्देश मानवी सेवनास सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन देणे हा आहे. या कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करण्याचे कामकाज अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागामार्फत केले जाते. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या Eat Right India या कार्यक्रमांतर्गत Hygiene Rating या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील विविध हॉटेल/रेस्टॉरंट त्याचप्रमाणे कंपनी, दवाखाने व शैक्षणिक संस्थेतील कॅन्टीन या आस्थापनांनी मानांकन प्राप्त करून घेतले आहे.

Hygiene Rating ही संकल्पना रेस्टॉरंट/हॉटेल या आस्थापनांसाठी तर Eat Right Campus ही संकल्पना कंपनी, दवाखाने व शैक्षणिक संस्थेतील कॅन्टीन या आस्थापनासाठी असून या आस्थापनांनी प्रथम Eat Right India या संकेतस्थळावर नोंदणी करून अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण (अन्न व्यावसायिकांचे परवाने/नोंदणी) नियमन 2011 मधील परिशिष्ट 4 मधील तरतुदींची पुर्तता केल्यानंतर Audit Agency कडून Audit झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण यांच्याकडून संबंधित आस्थापनेस मानांकन प्रमाणपत्र प्राप्त होते.

हे मानांकन प्रमाणपत्र अन्न व्यावसायिक त्यांच्या व्यावसायाच्या ठिकाणी प्रदर्शित करू शकतात. त्यामुळे त्यांची आस्थापना ग्राहकांना अन्न सेवनासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून निवडता येईल. रायगड जिल्ह्यातील एम.जी.एम हॉस्पीटल, कामोठे, शंकरा आय हॉस्पीटल, पनवेल, पिल्लई कॉलेज, पनवेल व रिलायन्स इंडस्ट्रिज, नागोठणे, ता.रोहा या आस्थापनांमधील कॅन्टीनने Eat Right Campus चे मानांकन तसेच डॉमीनोझ पिझ्झा, मॅकडोनाल्ड, रॅडिसन्स ब्ल्यु, अलिबाग या आस्थापनांनी Hygiene Rating मानांकन प्राप्त करून घेतले असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) पदावधित अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य श्री.ल.अं.दराडे यांनी कळविले आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज