जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2022 ची आढावा बैठक संपन्न
अलिबाग,
दि.29 (जिमाका):- जवाहर नवोदय विद्यालय, निजामपुर रायगड
येथे इयत्ता 6 वी वर्गाच्या प्रवेशासाठी दि.30 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्रवेश
परीक्षेच्या पूर्वतयारी संदर्भातील आढावा बैठक दि.28 एप्रिल 2022 रोजी रायगड जिल्हा परिषद येथे संपन्न झाली.
या बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा
परिषद, शिक्षण विभागाचे वरिष्ठ विस्तार अधिकारी श्री.संतोष राजाराम शेंडगे, माणगाव गटशिक्षणाधिकारी
सौ.सुनिता खरात, जवाहर नवोदय
विद्यालय, निजामपुरचे प्राचार्य श्री.के.वाय. इंगळे, जवाहर नवोदय
विद्यालय प्रवेश परीक्षा 2022 चे प्रभारी श्री.संतोष चिंचकर यांची प्रमुख उपस्थिती तसेच
रायगड जिल्ह्याच्या 15 तालुक्यातील केंद्र संचालक आणि केंद्र
निरीक्षक म्हणून नवोदय विद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
या बैठकीत परीक्षेचे स्वरूप आणि त्यासाठी
आवश्यक पूर्वतयारी याची माहिती सर्व उपस्थित केंद्र संचालकांना देण्यात आली. तसेच
यावेळी सर्वाधिक परीक्षार्थींची नोंद असणारे केंद्र म्हणून पनवेल तालुका आणि
सर्वाधिक परीक्षार्थी टक्केवारी नोंद असणारे केंद्र म्हणून उरण तालुक्याच्या
गटशिक्षणाधिकारी यांचा सत्कार नवोदय विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.
या बैठकीत विद्यालयाच्या वतीने प्राचार्य के.
वाय. इंगळे तर केंद्र संचालकांच्या वतीने शिक्षण विस्तार अधिकारी श्री.संतोष
शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीचे सूत्रसंचालन केदार केंद्रेकर यांनी
केले तर श्री.कैलास वाघ यांनी आभार व्यक्त केले.
00000
Comments
Post a Comment