उन्हाळी शिबीरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी, नागरिक, खेळाडूंनी सहभाग घ्यावा --- जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक

 

 

 

अलिबाग, दि.27 (जिमाका):- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग आणि डिफेन्स अकॅडमी अलिबाग यांच्या  संयुक्त विद्यमाने दि.28 एप्रिल ते दि.30 एप्रिल 2022 रोजी संध्याकाळी 4.00 ते 7.00  या वेळेत विविध क्रीडा उपक्रम उन्हाळी प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे.

आजच्या युगात सर्व मुला- मुलींनी स्वसंरक्षण शिकावे, स्वत:चे रक्षण करण्यासाठी सक्षम बनावे, आत्मनिर्भर बनावे, हसत खेळत शारीरिक व मानसिक दृष्टया सक्षम व निरोगी व्हावे, त्यांच्या  भविष्याला योग्य दिशा मिळावी,  या हेतूने  स्वसंरक्षण कला व आत्मनिर्भरता, क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शन, शारीरिक व मानसिक सक्षमीकरण, मुलांच्या फिटनेस ॲक्टिविटी, योगा, मेडिटेशन व प्राणायम, संभाषण  कौशल्य व व्यक्तिमत्व विकास, करिअर  मार्गदर्शन व सैन्य भरती संदर्भात मार्गदर्शन व आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जागरुकता  इत्यांदी विविध उपक्रम जयमाला गार्डन, अलिबाग येथे घेतले जाणार आहेत. 

            या उन्हाळी शिबीरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी, नागरिक, खेळाडूंनी सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत