तृतीयपंथीयांच्या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत तृतीयपंथीयांसाठी “पाठ्यवृत्ती”
इच्छुक तृतीयपंथीयांनी दि.10 जून 2022 पर्यंत प्रस्ताव पाठवाविण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन
अलिबाग,दि.17 (जिमाका):- भारत निवडणूक
आयोगाच्या अखत्यारीत कार्यरत असलेले महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय
तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी गेल्या काही महिन्यात विविध प्रयत्न करीत आहे. तृतीयपंथीयांचे
गुरु, दयार यांच्या भेटी घेण्यात आल्या. तसेच तृतीयपंथीयांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांशी
संवाद साधण्यात आला. यातून असे लक्षात आले की, तृतीयपंथीयांच्या समस्या मतदार नोंदणीच्या
पलीकडे आहेत. त्यांच्या या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी
कार्यालय तृतीयपंथी व्यक्तींना पाठ्यवृत्ती देऊ करीत आहे. एक वर्षे कालावधीच्या या
पाठ्यवृत्तीसाठी दीड लाख रुपये रक्कम दिली जाणार आहे.
ही पाठ्यवृत्ती
तृतीयपंथी व्यक्तींनाच दिली जाणार असून इच्छुक तृतीयपंथीयांनी दि.10 जून 2022 पर्यंत
प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.
प्रस्ताव पाठविण्यासाठी https://forms.gle/SiPuqkBzu3ziHNiu7
या गुगल अर्जावरील माहिती भरून अर्ज करावेत. या संदर्भातील अधिक माहिती मुख्य निवडणूक
अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceo.maharashtra.gov.in/
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा अधिक माहितीसाठी श्रीमती साधना गोरे (मो.क्र. 9987773802)
यांच्याशी संपर्क साधावा, असेही मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कळविले
आहे.
00000
Comments
Post a Comment