लेखा व कोषागारे संचालक वैभव राजेघाटगे यांनी दिली अलिबाग जिल्हा कोषागार कार्यालयास भेट

  

अलिबाग,दि.01 (जिमाका):- लेखा व कोषागारे संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे संचालक श्री.वैभव राजेघाटगे यांनी लेखापरीक्षण अहवालाच्या अंतिमीकरण कामानिमित्त अलिबाग जिल्हा कोषागार कार्यालयास काल (31 मे रोजी) भेट दिली. यावेळी लेखा व कोषागारे, कोकण विभागाचे सहसंचालक श्री.अनुदीप दिघे हे उपस्थित होते. या दोन्ही मान्यवरांचे जिल्हा कोषागार अधिकारी श्री. रमेश इंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.   

यावेळी कोषागारातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

श्री.वैभव राजेघाटगे हे वित्त व व लेखा सेवेतील एक अत्यंत प्रयोगशील, प्रामाणिक,संवेदनशील, उपक्रमशील अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी सांगली येथील जिल्हा परिषद मुद्रणालय, निवृत्ती वेतनधारकांसाठी केलेले काम, कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी राबविलेले विविध उपक्रम याची विशेष दखल राज्यपातळीवर घेण्यात आली असून अधिकारी-कर्मचारी तसेच लोकप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

यानिमित्त संचालक श्री.राजेघाटगे यांनी कोषागारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.कोषागाराची पाहणी करून कोषागारातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच त्यांनी सर्व शासकीय विभाग आणि विशेष म्हणजे निवृत्तीवेतनधारकांना तत्पर सेवा देण्याविषयी आवाहन केले.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज