पोलादपूर तालूक्यात मान्सून पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर मंडळनिहाय भेटीचा कार्यक्रम संपन्न


अलिबाग, दि.08 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी महाड श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर तालूक्यात आगामी मान्सून कालावधीची पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर मंडळनिहाय भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार मौजे माटवण व मौजे वाकण येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी पूर, दरड कोसळणे यासारख्या आपत्ती येण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी, दरडी घसरण्यापूर्वीची लक्षणे, शासनाकडून केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमास तहसिलदार दीप्ती देसाई, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.चंद्रकांत कळंबे व श्रीमती सुमन कुंभार, मंडळातील ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज